'
30 seconds remaining
Skip Ad >

गडचिराेली: गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरूंचे नाव व फाेटाेचा साेशल मीडियावर गैरवापर: पाेलीस ठाण्यात तक्रार | BatmiExpress™

0

Gondwana University,Gadchiroli News,Chandrapur News,Chandrapur,Gadchiroli  Live News,Gadchiroli,Chandrapur Live,Chandrapur News IN Marathi,Gadchiroli Batmya,

प्रतिनिधी / गडचिराेली : स्थानिक गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांचे जी-मेल खाते हॅक करून त्यांच्या संबंधितांना फसविण्याचा प्रयत्न करण्यात आला. या संदर्भात विद्यापीठ प्रशासनाने गडचिरोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. विशेष म्हणजे अनाेळखी 'व्हॉट्सॲप' क्रमांकावरून कुलगुरूंचे नाव व फाेटाेचा साेशल मिडीयावर गैरवापर करण्यात आला. ऑनलाईन फसवणुकीच्या प्रकारात सर्वत्र वाढ झालेली असताना अज्ञात भामट्यांनी थेट गडचिराेली येथील गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनाच लक्ष्य केल्याने विद्यापीठ वर्तुळात खळबळ उडाली आहे. अज्ञात भामट्यांनी कुलगुरूंचे जीमेल खाते हॅक केले. त्यातून संबंधितांचे दूरध्वनी क्रमांक चोरून कुलगुरूंचे छायाचित्र असलेल्या 'व्हॉट्सॲप' क्रमांकावरून सर्वांना एक 'लिंक' पाठविली. त्यात 'ॲमेझॉन'च्या कूपनसंदर्भात माहिती समाविष्ट करा, अशी विनंती करण्यात आली होती.

सदर बाब लक्षात येताच विद्यापीठ प्रशासनाने तत्काळ नाेटीस काढून अज्ञात हॉट्सॲप' क्रमांकावरून येणाऱ्या संदेशाला प्रतिसाद देवू नये, पाठविलेली लिंक ओपन करू नये, असे आवाहन करण्यात आले. तसेच पाेलीस विभागाच्या सायबर सेल शाखेत तक्रार करण्यात आली असल्याची माहीती कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्या स्वियसहायकांनी दिली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×