'
30 seconds remaining
Skip Ad >

Tiger Attack: वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार | BatmiExpress™

0


भंडारा
: शेतात गुरे चारण्यासाठी गेलेला शेतकरी वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्याची घटना पवनी तालुक्यातील सवरला जंगलात गुरुवारी सकाळी 10वाजता उघडकीस आली. रमेश मोतीराम भाजीपाले ( वय - 65) रा. सावरला ता. पवनी असे मृताचे नाव आहे. 

तो बुधवारी आपली गुरे घेऊन चराईसाठी जंगलात गेला होता. सायंकाळी घरी परतला नाही. त्या शोध घेतला असता रात्री थांगपत्ता लागला नाही. गुरुवारी सकाळी गावकरी व वन विभागाच्या पथकाने शोध घेतला असता सावरला बिटातील गट क्र.540 मध्ये सकाळी 10 वाजताच्या सुमारास त्याचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाचे निरीक्षण केले असता वाघाने हल्ला करून यास  ठार केल्याचे दिसून आले. तातडीची 20 हजाराची मदत मृतकाच्या परिवाराल दिल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी बारसागडे यांनी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×