तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

Gondia Railway Accident : गोंदियामध्ये रेल्वेचा भीषण अपघात, पॅसेंजर ट्रेनला मालगाडीची धडक, 50 हून अधिक प्रवासी जखमी | BatmiExpress™

Gondia,Gondia Accident,Gondia Live News,gondia news,Gondia Live,rail accident,Railway Accident,

Gondia,Gondia Accident,Gondia Live News,gondia news,Gondia Live,rail accident,Railway Accident,

  • 50 पेक्षा जास्त प्रवासी किरकोळ जखमी
  • पॅसेंजर ट्रेनला मालगाडीची धडक
  • गोंदियामध्ये रेल्वेचा भीषण अपघात

प्रतिनिधी/ गोंदिया : जिल्ह्यातून मोठी बातमी समोर आली आहे. रायपूरकडून नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या "भगत की कोठी" एक्स्प्रेसला गोंदिया शहरालगत अपघात झाला आहे. समोर जात असलेल्या मालगाडीला भगत की कोठी ट्रेनने मागून धडक दिली. धडक दिल्यानंतर रेल्वेचा एक डब्बा रुळावरून खाली घसरला आहे. या अपघातात 50 पेक्षा जास्त प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमी प्रवाश्यांवर जिल्हा सामान्य रुग्णालय व तसेच खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे 4 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. भगत की कोठी एक्स्प्रेस नागपूरच्या दिशेनं जात होती. गोंदिया शहरालगत रेल्वे पोहोचली असता अचानक समोर जात असलेल्या मालगााडीला पाठीमागून रेल्वे धडकली. धडक दिल्यानंतर मोठा आवाज झाला आणि रेल्वेचा एक डब्बा रुळावरून खाली घसरला.

पहाटे साखर झोपेत असलेल्या प्रवाशांना एकच धक्का बसला. डब्ब्यातील प्रवाशांना मोठा झटका बसला त्यामुळे 50 पेक्षा जास्त जण यात जखमी झाले. सुदैवाने रेल्वेचे वेग जास्त नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. अपघाताची माहिती मिळताच रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या जवानही घटनास्थळी पोहोचले. जखमींना तातडीने शासकीय आणि नजीकच्या खासगी रुग्णालयामध्ये दाखल केले आहे. काही जणांना किरकोळ जखमा असल्यामुळे प्राथमिक उपचार करून सोडून देण्यात आले आहे. घटनास्थळी रेल्वेे कर्मचारी पोहोचलेले आहे, मदतकार्य सुरू आहे.  परंतु, नेमका हा अपघात कशामुळे घडला हे अद्याप समोर आलेले नाही, रेल्वेचे कर्मचारी या घटनेचा तपास करत आहे.


Representative/Gondia: Big news has come out from the district. "Bhagat ki Kothi" express from Raipur towards Nagpur met with an accident near Gondia city. Bhagat ki Kothi train hit the goods train going in front from behind. A coach of the train has derailed after the collision. It has been reported that more than 50 passengers were slightly injured in this accident. The injured passengers are being treated at the District General Hospital and also at a private hospital.

According to the information received, this incident took place around 4 o'clock in the morning today. Bhagat Ki Kothi Express was going towards Nagpur. When the train reached near Gondia city, suddenly the train hit the goods train going in front from behind. After the impact, there was a loud noise and a coach of the train derailed.

In the morning, the sleepy passengers got a shock. The passengers in the coach got a big shock and more than 50 people were injured. Fortunately, a major accident was avoided as the speed of the train was not high. As soon as the information about the accident came, the railway employees immediately rushed to the spot. Ambulance and firemen also reached the spot. The injured have been immediately admitted to government and nearby private hospitals. Some have been treated and released for minor injuries. Railway employees have reached the spot, relief work is going on. However, the exact cause of the accident is yet to be revealed, the railway staff is investigating the incident.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.