'
30 seconds remaining
Skip Ad >

गडचिरोली: चामोर्शी पंचायत समितीचा आरोग्य सेवक अडकला ACB च्या जाळ्यात - BatmiExpress™

0

Chamorshi,Chamorshi News,Gadchiroli,Gadchiroli News,Gadchiroli Batmya,Gadchiroli live,

गडचिरोली
: पंचायत समिती चामोर्शी ( Panchayat Samiti Chamorshi ) येथील आरोग्य सेवक ( health worker ) रामचंद्र पाटेवार (४७) लाच रक्कम स्वीकारतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Anti-Bribery Department )  जाळ्यात अडकले आहेत. रामचंद्र पाटेवार ( Ramchandra Patewar )  यांचे विरूध्द तडजोडअंती ३ हजार ५०० लाच रक्कमेची मागणी केल्याप्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमन्वे गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे. 

प्राप्त माहितीनुसार, तक्रारदार यांनी पत्नीच्या नावे आरोग्य सेवक रामचंद्र मार्कंडी पाटेवार यांच्याकडे कोतवाल पंजी प्रमाणपत्र बनवून मागीतले असता आरोग्य सेवक रामचंद्र मार्कंडी पाटेवार यांनी सदर काम करुन देण्यासाठी 4 हजार रुपयांच्या लाच रकमेची मागणी केली मात्र तक्रादार यांना सदर लाच रक्कम देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाप्रवि गडचिरोली येथे तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे शहानिशा करून सापळा रचला असता आज 2 ऑगस्ट रोजी आरोग्य सेवक रामचंद्र मार्कंडी पाटेवार यांना पंचायत समिती चामोर्शी येथील कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने 3 हजार 500 रुपयांची लाच रक्कम स्विकारतांना रंगेहाथ पकडले.

 याप्रकरणी लाचखोर आरोग्य सेवक रामचंद्र मार्कंडी पाटेवार यांच्या विरोधात पोलीस स्टेशन चामोर्शी येथे भ्रष्टाचार प्रतिबंध कायदयान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई, पोलीस उपअधिक्षक सुरेंद्र गरड यांच्या मार्गदर्शनात पोनि श्रीधर भासेले, सफौ प्रमोद ढोरे, नापोशि किशोर जौंजाळकर, श्रीनिवास संगोजी, संदिप घोरमोडे, संदिप उडाण, मपोशि विद्या म्हशाखेत्री व चापोहवा तुळशिराम नवघरे यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×