गडचिरोली: कोरची तालुक्यात आजादी का अमृत महोत्सव साजरे झाले अंधारात, 75 तासा पैकी 50 तास तालुका अंधारात | BatmiExpress™

Be
0
Gadchiroli News,Gadchiroli  Live News,Gadchiroli,Gadchiroli live,Korchi,Gadchiroli News IN Marathi,Gadchiroli Batmya,

कोरची ( चेतन कराडे - प्रतिनिधि ) :- नेहमी भोंगळ कारभाराचा साठी चर्चेत राहणाऱ्या कोरची येथील विद्युत विभागाने नवीनच विक्रम केले असल्याचे दिसून आले 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट पर्यंत संपूर्ण देशाने आजादी का अमृत महोत्सव साजरे केले. भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाले असून आदिवासीबहुल नक्षलग्रस्त असलेल्या कोरची तालुक्यातील विद्युत पुरवठा 75 तासांपैकी 50 तास हे अंधारात असल्यामुळे कोरची तालुक्यातील आजादी का अमृत महोत्सव अंधारात गेले असल्याचे दिसून आले.

75 तासा पैकी 50 तास होते तालुका अंधारात

देशाच्या स्वातंत्र्याचे 75 वर्ष पूर्ण झाल्यामुळे कोरची तालुक्यातील बहुतेक विभागातर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु संपूर्ण देशात रोषणाई होत असताना कोरची तालुका मात्र अंधारात उत्सव साजरे करीत असल्याचे दिसून आले. यामुळे विद्युत विभागाचे कोरची तालुक्यासाठी असलेले गांभीर्य बघायला मिळाले. विद्युत् विभागाच्या सुधारणेसाठी कित्येक निवेदन, आंदोलन व उपोषण करण्यात आले परंतु परिस्थिती अजूनही जैसे थे असल्याचे दिसून येत आहे.

आज तंत्रज्ञानाच्या युगात कुठल्याही समस्येचे हल करण्यास वेळेची खूप बचत केली जाते. परंतु कोरची तालुक्यात जास्तीचे वेळ खर्च करून सुद्धा त्याचा मोबदला शुन्यच असल्याचे दिसून येत आहे. नागरिकांना अवाच्या सव्वा बिल येत असून सेवा मात्र कवडीमोलाचि असल्यामुळे कोरची तालुक्यातील नागरिकांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असून या दिवसात विषारी जीवजंतूचा संचार बघितला जातो.

आजपर्यंत तालुक्यात कित्येक लोकांचा जीव सुद्धा या विषारी जीव जंतूमुळे गेला असल्याचे दिसून आले सतत. अंधारात या जीवजंतुचे हल्ले वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. सतत होणाऱ्या वीज खंडितेमुळे  शेतकऱ्यांना सुद्धा शेतीची कामे करण्यास अडचणीचा सामना करावा लागत सतत.

सध्याचे युग हे डिजिटल झाले असून विद्यार्थ्यांचे व नागरिकांचे बहुतेक कामे ही ऑनलाईन पद्धतीने झाले असून कोरची तालुक्याचे डिजिटल युगाची काही देणेघेणे नसल्याचे दिसून येत सतत. विद्यार्थ्यांचे सुद्धा शैक्षणिक नुकसान होत असून काही दिवसांपूर्वी MS-CIT चे विद्यार्थी हे विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे त्यांना परीक्षेपासून मुकावे लागले होते याकरिता त्यांनी कोरची येथील विद्युत कार्यालयात मोर्चा सुद्धा नेला होता.

मागील काही महिन्यापासून विद्युत विभागाने कोरची तालुक्यात डोकेदुखी वाढवली असून याकडे विद्युत विभागाच्या वरिष्ठांचे सुद्धा दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत सतत. सतत होणाऱ्या वीज खंडितेमुळे कित्येक व्यापाऱ्यांचे सुद्धा आर्थिक नुकसान होत सतत. ज्यामुळे मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे आर्थिक अडचणीत आलेल्या व्यापाऱ्यांनी आपले उदरनिर्वाह करावे तरी असा? असा प्रश्न निर्माण झाला आहे. आजादी का अमृत महोत्सव अंधारात साजरे करणाऱ्या कोरची तालुक्याने विकासाची अपेक्षा करावी तरी कोणाकडे असा प्रश्न तालुक्यातील नागरिकांच्या मनात निर्माण होत आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->