सावली: शेतातील आपले काम पूर्ण करून वाटेत बैल धूत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून शेतमजुराला ठार केल्याची घटना आज ११ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता दरम्यान हिरापूर येथे घडलेली आहे. भक्तदास श्रीरंग झरकर ( वय 35 ) वर्ष रा. हिरापुर असे वाघाच्या हल्लात ठार झालेल्या शेतमजुराचे नाव आहे.
सावली तालुक्यातील हिरापूर येथील रहिवासी भक्तदास श्रीरंग झरकर, वसंत पिपळखेडे आणि रजत राउत हे तिन शेतमजुर सुरेश भिसे यांच्या शेतात रोजीने आवत्याला बाशी मारण्यासाठी गेले होते. या भागातील अनेक शेत जमीनी झुडपी जंगल व्याप्त असल्यामुळे नेहमीच या भागात वन्य जीवांचा धोका असतो तरीही शेतकरी आपला जीव मुठित घेऊन शेतशिवाराची कामे करताना दिसतात.
शेतमजूर बाशीचे काम पुर्ण करून बैलाना चराईसाठी किसाननगर शेतशिवारा लगत असलेल्या कोंडेखल मायनर लोडी पुलाजवळ बैल चारत असताना दोन मोठे वाघ परिसरात दबा धरून बसलेले होते. परिणामी वाघ पाहुन बैल चवताळले त्यामुळे तिन्ही शेतकरी झुडपात लपुन बसले असताना, अचानक समोरा-समोर भक्तदास झरकर यांच्यावर वाघाने हल्ला करून फरफतत नेले, उर्वरित दोन्ही शेतमजुरांनी आरडाओरड केली असता वाघाने घटनास्थळावरून पळ काढला मात्र तोपर्यंत वाघाच्या हल्लात भक्तदास झरकर यांचा जिव याने आपला जीव गमविला. मृत्तकाच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी आहे. या घटनेची माहिती कळताच सावलीचे वनपरिक्षेत्राधिकारी वैभव राजुरकर व वनविभागाचे कर्मचारी दाखल होवुन पंचनामा तयार केला.