एक पुरुष व वाईचे प्रेत नदीचे पाण्यात पालथ्या स्थितीमध्ये तरंगतांना दिसले, त्यावेळी दोन्ही प्रेताचे हाताला, गळयाला भोवताल पिवळया रंगाचे नॉयलन दोरीने बांधुन त्यांचे शरीरावर जख्मा असल्याचे दिसले. त्यावरून असे दिसुन आले की, दोन्ही प्रेताला कोणीतरी अज्ञात आरोपीने त्यांना अज्ञात कारणाकरीता जिवानीशी ठार मारून त्यांचे प्रेत नदीचे पाण्यात फेकुन दिले आहे.
नागपूर : बोरी अंतर्गत ०२ कि. मी अंतरावरील नागपूर ते चंद्रपूर रोड, वेणा नदीचे पुलाखाली मौजा रूईखैरी शिवार येथे ०७ जुलै २०२२ चे १०.३० वा. दरम्यान सरतर्फे फिर्यादी पो.उप.नि. मुन्नासिंग ठाकुर पो.स्टे. बोरी हे पो.स्टे. बोरी हद्यीमध्ये चंद्रपूर, वर्धा ते नागपूर हायवे रोडवरील वाय पॉइंट या ठिकाणी ईद सणा निमीत्य पोलीस स्टॉपसह नाकाबंदी करीत असतांना त्यांना जितेंद्र गोविंदराव नागेश्वर वय १८ वर्ष रा. रूईखैरी याने येवुन सांगीतले की, तो वेणा नदीचे जुने पुलाकडे शौचास गेला असताना त्याला वेणा नदीचे पाण्यात एक पुरूष व एका बाईचे प्रेत तरंगत असताना दिसले. तेव्हा फिर्यादीने त्या मुलासोबत जावुन घटनास्थळवर पाहणो केली असता एक पुरुष व वाईचे प्रेत नदीचे पाण्यात पालथ्या स्थितीमध्ये तरंगतांना दिसले, त्यावेळी दोन्ही प्रेताचे हाताला, गळयाला भोवताल पिवळया रंगाचे नॉयलन दोरीने बांधुन त्यांचे शरीरावर जख्मा असल्याचे दिसले. त्यावरून असे दिसुन आले की, दोन्ही प्रेताला कोणीतरी अज्ञात आरोपीने त्यांना अज्ञात कारणाकरीता जिवानीशी ठार मारून त्यांचे प्रेत नदीचे पाण्यात फेकुन दिले आहे.
दोन्ही मृतकाचे वर्णन :
अनोळखी मृत स्त्री - वय अंदाजे २५ ते ३० वर्ष उंची अंदाजे ५.२ इंच बांधा मध्यम रंग सावळा, केस लांब तिचे अंगावर पिवळ्या, लाल रंगाची साडी, अंगात चॉकलेटी रंगाचा ब्लाउज तसेच उजवे हातावर US उत्तम गोंधलेले असुन नाकात पिवळया धातुची बेसर आहे. तिचे नाकातोंडातून रक्त निघत असलेले व गळयाला छाती व मांडीमधुन पिवळया रंगाची नॉयलान दोरी बांधलेली सोबत एक काळया रंगाचा दगड अंदाजे २५ ते ३० किलो वजनी आणि त्याच दोरीने बांधुन असलेला दिसला.
अनोळखी मृत पुरुष - वय अंदाजे २५ वर्ष उंची अंदाजे ५.४ इंच बांधा मध्यम, रंग सावळा, त्याचे अंगात चौकट डिझाईनची पांढरा, लाल, काळा, निळा रंगाची फुल बाई टि शर्ट व काळ्या रंगाचा जिन्स पेन्ट, कमरेत काळा पटटा घातलेला, उजवे कानात विकृती खडा तसेच उजवे हाताचे मनगटावर VS उत्तम, गोंधलेले आहे. त्याचे नाक कानातून रक्त निघत असलेले व गळया भोवती काळया रंगाची व्रण दिसुन आले.
सदर प्रकरणी फिर्यादी याचे रिपोर्टवरून पो.स्टे. बोरी येथे अज्ञात आरोपीविरुध्द कलम ३०२,२०१ भादवि. अन्वये गुन्हा नोंद केला आहे. अज्ञात आरोपीचा शोध घेणे सुरू आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास श्रीमतो पुजा गायकवाड उप विभागीय पोलीस अधीकारी नागपूर विभाग, नागपूर या करीत आहे
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.