ब्रम्हपुरी: मौजा चिचोली (बुज) येथील श्री. देवदास इसनजी मेश्राम हा मजूर श्री. तात्याजी ढोरे चिंचोली यांच्या शेतात रोवणी करण्याकरीता गेला असता धानाचा परा काढत असतांना एका रानडुकराने जोरात येऊन श्री. देवदासजी मेश्राम याला जोरदार थडक दिली. त्यात ह्या मजुराच्या डाव्या हाताला त्या राणडुकराचे चार ते पाच ठिकाणी दात रुतले आणि हा मजूर जाग्यावरच कोसळला त्याच्या शेजारी त्याची पत्नी असल्यामुळे त्याला उचलून बांधीच्या धुऱ्यावर काढले आणि लगेचच गावचे सरपंच यांच्या मदतीने जखमी मजुराला प्राथमिक आरोग्य केंद्र ब्रम्हपुरी येथे त्या मजुराला दाखविले तिथे त्यावर डॉक्टरांनी योग्य उपचार करून त्याला औषध दिले.
मजुराच्या हाताला खूपच सुजन आली असून या मजुराची आता असलेली शेतीकामाची सिजन हि गेली असल्यामुळे शासनाकडून जखमी मजुराला योग्य ती मदत मिळावी अशी मागणी गावक-यांकडून करण्यात येत आहे.