चंद्रपूर - जिल्ह्यात आठवडा भर विश्रांती घेतलेल्या मुसळधार पावसाने पुन्हा आपलं जोर कायम केलं आहे. जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली. तर काही नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलं होत. त्यामुळे आधीच आलेल्या पुरामुळे नागरिक सावरले नसताना एकदा पुन्हा नदी काठावरील गाव व नागरिकांना पुराचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. ( Irai Dam Flood 2022 )
चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे इरई धरण 91 टक्के भरल्याने काही प्रमाणात पुन्हा दरवाजे उघडत पाण्याचा विसर्ग सुरू करण्याचा निर्णय औष्णिक विद्युत केंद्राने घेतला आहे. ( Chandrapur Flood )
इरई धरणाचे दरवाजे खालील प्रकारे उघडतील :
- 5 दरवाजे - 0.50 मीटरने ( सध्या सुरु )
- 7 दरवाजे - 0.50 मीटरने ( 1 उघडण्यात येणार )
इरई धरणातील ( Irai dam ) पाण्याची आवक वाढल्याने धरणाची पाणी पातळी कायम राखण्यासाठी धरणामधुन आज सध्या 5 दरवाजे उघडले असून असून, 179.635 cum/sec क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आलं आहे. अर्ध्या तासांनी पुन्हा 0.50 मीटरने धरणाचे दरवाजे उघडण्यात येणार आहे, दर अर्ध्या तासाने 0.25 मीटरने दरवाजे उघडण्यात येणार आहे. ( Chandrapur Flood 2022 )
त्यानंतर 1 तासांनी पुन्हा धरणाचे सर्व 7 दरवाजे उघडण्यात येणार आहे. त्यामुळे नदी काठी राहणाऱ्या गाव व नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.