- बातमी एक्सप्रेस - गडचिरोली वृत्तसेवा
शहरातील पोटेगाव मार्गावरील जिलानी बाबा दर्गाच्या बाजूने हजारे आटाचक्कीकडे जाणाऱ्या रस्त्यालगतच्या नालीमध्ये इसमाचा मृतदेह नागरिकांना आढळून आला. याबाबत नागरिकांनी माहिती देताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह नालीतून बाहेर काढला. मृतक इसमाची ओळख अद्याप पटलेली नसून मृतकाच्या कपाळावार धारदार शस्त्राचे वार केल्याच्या जखमा, कान कापलेले तसेच गळयात दोरीसारखा फास व कंबरेला मागच्या बाजूने मार आहे. त्यामुळे ही हत्याच असल्याचे बोलले जात आहे.
सदर इसमाची हत्या करुन हत्यारांनी मृतदेह मध्यरात्रीच्या सुमारास नालीत टाकला असावा, असा अंदाज बांधला जात आहे. मृतदेह उलट्या स्थितीत ग्रीन मॅट झाकलेल्या अवस्थेत नागरिकांना आढळून आला. मृतकाचे वय अंदाजे 30-35 वर्ष दरम्यान आहे. घटनास्थळ परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे असून सीसीटीव्ही फुटेज मधून काही सुगावा लागतो काय याचा सुद्धा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात येत आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून पोलीसांनी मृतदेह ताब्याब घेतला आहे. बातमी लिहिस्तोवर इसमाची ओळख पटविण्याचे काम पोलीसांकडून सुरु होते. पुढील तपास गडचिरोली पोलीस करीत आहे.