Gadchiroli Heavy Rain Alert News: गडचिरोली जिल्ह्यात ३ दिवसांपासून मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असतानाच पुन्हा पुढील तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून संपूर्ण जिल्ह्यात रेड अर्लट झोन घोषित करण्यात आले असून त्यामुळे त्यामुळे तीन दिवस शासकीय कार्यालय वगळता संपूर्ण खासगी कार्यालये, शाळा , महाविद्यालय बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशानाकडून देण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी संजय मिना यांनी आज तातडीने घेण्यात आलेल्या पत्रपरिषदेतून दिली आहे.
पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण होऊन कुठल्याही प्रकारची जिवित हानी होऊ नये, याशिवाय कुठलिही अनुचित घटना घडू नये म्हणून ही खबरदार घेतली जात आहे.
पुढील 72 तासात गडचिरोली जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल हे सांगता येत नाही, त्यामुळे कोणीही विनाकारण बाहेर न पडण्याचे आवाहन जिल्हाधिकारी मिना यांनी केले आहे. फक्त जीवनावश्यक वस्तूची दुकाने आणि औषधांची दुकाने सुरू राहतील, इतर नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये असेही मिना म्हणाले.