चंद्रपूर: गोंडपीपरी शहरातील राळापेठ येथे जिल्हा परिषद शाळेवर अचानक वीज कोसळल्याची घटना आज दिनांक 9 जुलै शनिवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास घडली. यात तीन विद्यार्थी किरकोळ जखमी झाले असून शाळेतील साहित्याचे फार मोठे नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
जखमी झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव खालील प्रमाणे आहेत:
- अमर माधव राऊत इयत्ता 4 थी
- राशी विनायक ताजने इयत्ता सातवी
- निशांत अंगुली मान उराडे इयत्ता सातवी
यांचा समावेश आहे.
यात शाळेतील टी व्ही पंखे, व इतर विद्युत उपकरणे जळून खाक झाली आहे असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
तालुक्यात विजांच्या गडगडाटा सह मुसळधार पाऊस सुरू असून नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.