Chandrapur Flood 2022: इरई धरणाचे 7 दरवाजे उघडले, नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा - #BatmiExpress

Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Flood,Chandrapur Live,Chandrapur Today,Chandrapur Flood 2022,Chandrapur News IN Marathi,

 Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Flood,Chandrapur Live,Chandrapur Today,Chandrapur Flood 2022,Chandrapur News IN Marathi,

चंद्रपूर ( Chandrapur Flood 2022 ) :- जिल्ह्यात सतत सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.  सलग 6व्या दिवशी मुसळधार पाऊस चालू असल्याने इरई धरणाची ( Irai Dam ) पातळी वाढली असल्याने चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत निर्मिती केंद्र, चंद्रपूर द्वारे प्राप्त सूचनेनुसार इरई धरणाचे संपूर्ण 7 दरवाजे ( Irai Dam Open 7 Gates1.0m ने उघडण्यात आले आहे. परंतु धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या सततच्या पर्जन्यामुळे धरणांच्या 7 दरवाजांची उघडण्यात 1.0 m ने वाढवण्यात येत आहे.

इरई  धरणातील पाण्याचा विसर्ग- 517 क्युमेकने झाला आहे. जिल्हा प्रशासनाने नदी काठच्या शहरातील वडगाव, हवेली गार्डन, नागीनाबाग, महसूल कॉलिनी, रहेमत नगर व झरपट नदी लगतच्यातुळजा भवानी वार्ड, महाकाली वार्ड या परिसरातील रहिवाश्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. 
नदी काठी राहणाऱ्या नागरिकांनी सावध होत, पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने जारी केलेल्या क्रमांकावर सम्पर्क साधावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.