चंद्रपूर - चंद्रपूर जिल्ह्यात मागील चार दिवसापासून सतत मुसधार पाऊस पडत होत. पण आज पावसाने विश्रांती घेतली असली तरी कैचमेंट भागात आजही पाऊस सुरू आहे.
त्यामुळे इरई धरण, निम्न वर्धा प्रकल्प व गोसेखुर्द प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदी पात्रजवळील राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. नदीपात्रातील पाण्याची पातळी केव्हाही वाढू शकते यासाठी नागरिकांनी सतर्क रहावे. ( Chandrapur Flood, Irai Dam Flood & Gosikhurd Flood 2022 )
आश्रयास असलेल्या नागरिकांनी आश्रयास्थानीच राहावे. रात्रीच्या वेळी सर्व नागरिकांनी सतर्कता बाळगावी. असे चंद्रपूर महानगरपालिका तर्फे आवाहन करण्यात येत आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.