CBSE Class 12th and 10th Result 2022: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) (Central Board of Secondary Education) घेण्यात आलेल्या इयत्ता 12वी बारावी आणि इयत्ता 10वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर (CBSE 12th and 10th Result 2022) करण्यात आलं आहे. 94 टक्के विद्यार्थी पास झाल्याची माहिती सीबीएसई बोर्डाने दिली आहे. 12वी आणि 10वी या दोन्ही परीक्षेत मुलांपेक्षा मुलींनी अव्वल बाजी मारली आहे.
12वी मध्ये मुलांपेक्षा मुलींचा निकाल 3.29 टक्के जास्त आहे. त्याच वेळी, 10वीच्या निकालात मुली 1.41 टक्क्यांनी पुढे आहेत.
दरम्यान, सुमारे 35 लाख विद्यार्थी 10वी आणि 12वी टर्म-2 च्या परीक्षेला बसले होते. यामध्ये 10वी च्या 21,16,290 व 12वीच्या 14,54,370 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ही परीक्षा एप्रिल 2022 ते जून 2022 या कालावधीत देशभरातील विविध ठिकाणी हजारो केंद्रांवर घेण्यात आली होती. तसेच या दोन्ही परीक्षेत मुलांपेक्षा मुलींनी अव्वल बाजी मारली आहे. , त्यामुळं सर्व स्तरातून मुलींचे कौतुक करण्यात येत आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.