चंद्रपूर: उन्हाळ्यात चंद्रपूरात सूर्य आग ओकू लागतो. यंदा चंद्रपूरच्या तापमानाने जागतिक रेकार्ड नोंदविले. हवामान विभागानं ६ जूनपर्यंत महाराष्ट्रात मान्सून सक्रीय होण्याचा अंदाज वर्तविला आहे. जून महिन्यातही चंद्रपूरचा तापमानाचा पारा घसरतो, मात्र यावर्षी जून महिनाही चंद्रपूरला चटके देत आहे. गुरूवारी चंद्रपूरचं तापमान देशात अव्वल ठरलं, गुरूवारी तापमान ४६.८ अंश सेल्सियस होतं. शुक्रवाररीही अंगाची लाही लाही करणाऱ्या तापमानाचा सामना चंद्रपूरकरांनी केला. कालचं तापमान ४६.४ अंशसेल्सियस होतं.
चंद्रपूर प्रमाणेच सूर्यदेव विदर्भातील इतरही जिल्ह्यांवर कोपला. ५ जूनपर्यंत उष्ण लहर राहण्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. त्यामुळे तुर्तास तरी उष्णतेपासून चंद्रपूरची सुटका नाही.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.