Rain Updates : पुढील पाच दिवसांत देशभरात पाऊस | Batmi Express

Be
0

rain news,rain,Rain Updates,Maharashtra,India,Delhi,Mumbai,

नवी दिल्ली :
ईशान्येकडील भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. यासोबतच आसाम आणि मेघालयमध्ये २ ते ४ जून या कालावधीत मुसळधार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये २ जूनपर्यंत आणि अरुणाचल प्रदेशात ४ जूनदरम्यान मुसळधार पाऊस होईल. बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे, अशी माहिती आयएमडीने दिली.

स्कायमेट वेदरच्या अहवालानुसार, हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. उत्तराखंड, महाराष्ट्र, छत्तीसगड, आंध्र प्रदेश आणि ओडिशामध्येही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दक्षिण भारतात मान्सून पुढे सरकत आहे, मात्र त्याचा वेग काहीसा कमी झाला आहे. गेल्या २४ तासांत लक्षद्वीप, अंदमान आणि निकोबार बेटांवर आणि केरळमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला. काही ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली. आयएमडीच्या माहितीनुसार, नैऋत्य मान्सूनने संपूर्ण केरळ व्यापले आहे. कर्नाटक आणि तामिळनाडूच्या काही भागासह नैऋत्येच्या अनेक भागात मान्सून पुढे सरकला आहे.

अरबी समुद्रातून येणाऱ्या मान्सून वाऱ्यांच्या प्रभावामुळे केरळ, लक्षद्वीपमध्ये हलका ते मध्यम पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, पुढील पाच दिवसांत कर्नाटकात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, पुद्दुचेरीमध्येही पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, जम्मू-काश्मीर आणि हिमाचलमध्ये एक वेस्टर्न डिस्टर्बन्स तयार झाला आहे, ज्यामुळे पुढील तीन दिवसांत या राज्यांमध्ये काही ठिकाणी पाऊस पडू शकतो.

पश्चिम राजस्थानपासून हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहारपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र कायम आहे. त्यामुळे हरियाणा, दिल्ली आणि पश्चिम उत्तर प्रदेशात हलका पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->