नागपूर: मंगळवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास वाडी परिसरातील मारुती सेवा शोरूमजवळ भरधाव कारने दिलेल्या धडकेत एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याची पत्नी व मुलगा गंभीर जखमी झालं आहे.
राष्ट्रपाल सुरेश शेंडे (वय - 31), रा. भिवसेन खोरी, गौतम नगर असे मृताचे नाव आहे. पत्नी ज्योत्सना (वय - 26) आणि मुलगा रिडॉय (वय - 4) अशी गंभीर जखमींची नावे आहेत.
मंगळवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास राष्ट्रपाल पत्नी आणि मुलासह त्यांच्या दुचाकीवरून (एमएच-31/ईव्ही 9803) जात होते. ते मारुती सेवा शोरूमजवळ आले असता भरधाव वेगाने आलेल्या कारने (MH-04/FB 4141) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. राष्ट्रपाल यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांची पत्नी आणि मुलगा गंभीर जखमी झाले. त्यांना मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
वाडी PSI पाठक यांनी अज्ञात कार चालकावर भादंवि कलम 304(A), 279, 337, 338 नुसार गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला.