'

Chandrapur Tiger Attack: वाघाच्या हल्ल्यात शेतकरी जागीच ठार | Be Media

0
Mul,Mul News,Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur Today,Tiger Attack,Chandrapur Tiger Attack,

चंद्रपूर : शेतात मशागतीचे काम करीत असताना अचानक पट्टेदार वाघाने शेतकऱ्यावर हल्ला  ( Tiger Attack )  केला. यात शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली.

प्रमोद झुंगाजी मोहुर्ले (४७), रा. पडझरी असे मृतकाचे नाव आहे. मूल वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयांतर्गत येणाऱ्या पडझरी येथील शेतकरी प्रमोद झुंगाजी मोहुर्ले हे शुक्रवारी सकाळी शेतात हंगामपूर्व मशागतीचे काम करण्यासाठी गेले होते. काम करीत असताना तिथेच दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. ( Chandrapur Tiger Attack )

आजूबाजूला त्यावेळी कोणीच नसल्याने प्रमोदची वाघाच्या तावडीतून सुटका होऊ शकली नाही. त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर याची माहिती इतर शेतकऱ्यांना झाली. त्यांनी लगेच वन विभागाला माहिती दिली. याबाबत माहिती मिळताच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आहे. मृतक प्रमोद यांच्या मागे पत्नी व दोन मुले असून, त्यांच्या नावे पडझरी येथे शेती आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×