'
30 seconds remaining
Skip Ad >

संतापजनक! बारावीच्या विद्यार्थ्याला नग्नावस्थेत अमानुष मारहाण - Be Media

0

 

Latur,Maharashtra,Maharashtra News,crime news,Crime,crim live

लातुर : लातुर पॅटर्न शिक्षणासाठी प्रसिद्ध आहे. परजिल्ह्यातून आणि परराज्यातून विद्यार्थी शिक्षणासाठी लातुरात येतात. त्यामुळे त्यांच्यात दहशत निर्माण करून पैसे उकळणारी क्राईम कंपनी लातुरात सक्रिय झाली आहे. इंस्टाग्रामवर शिवी दिल्यामुळे बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचं अपहरण करून खुनाचा प्रयत्न केला. एवढंच नाहीतर नग्न करून बेल्टने जबर मारहाण केली.

दरम्यान या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. इंस्टाग्रामवरून शिवी दिल्याच्या किरकोळ कारणावरून बारावीत शिक्षण घेणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थ्याचं सिने स्टाईल अपहरण करण्यात आलं. ही टोळी एवढ्यावर थांबली नाहीतर चक्क नग्न करून अमानुषपणे मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. एकूण अकरा जणांनी मिळून हा प्रकार केल्याचं समोर आलं आहे.

पोलिसांच्या सतर्कतेमुळे घातपाताचा आरोपींचा कट उधळला असला तरी या आरोपींनी क्रौर्याची सीमा गाठली आहे. यातील दोन आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत. तर इतर आरोपी त्यांचे हस्तक म्हणून काम करतात. याप्रकरणी पाच आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं आहे. तर, इतर सहा आरोपी अद्यापही फरार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×