चंद्रपूर:- चंद्रपूर - चंद्रपुर जिल्ह्यात कोरोनाने हळूहळू पाय पसरायला सुरुवात केली असून आज 4 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे.
- चंद्रपूर शहर -1
- वरोरा -1
- मूल - 2
नवे रुग्ण आढळले. जिल्ह्यात सक्रिय कोरोना बाधितांची एकूण संख्या आता 42 वर पोहचली आहे. (CoronaVirus Back In Chandrapur ) ( CoronaVirus Back In Chandrapur 2022 )
कोरोना मुक्त झालेला चंद्रपूर जिल्हा पुन्हा कोरोनाच्या विळख्यात येत आहे, वर्ष 2021 ला आलेली कोरोनाची भीषण महामारी नागरिक अजूनही विसरले नाही. ररोज हजारोच्या वर नागरिक कोरोना बाधीत होत होते, हजारो नागरिकांनी आपला जीव गमावला, आरोग्य व्यवस्था पूर्ण चव्हाट्यावर आली होती, ऑक्सिजन ची कमतरता, रेमडीसविर चा काळाबाजार अश्या अनेक समस्यांचा नागरिकांनी सामना केला होता.
नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. देशात काही ठिकाणी रुग्णसंख्या वाढत आहे. अशात हा रुग्ण सापडला असल्यानं चंद्रपूर जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आलंय. लक्षणं आढळल्यास पुन्हा तपासणी करण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.