वणी : १२ वी च्या परीक्षेत अनपेक्षित निकालानंतर एका महाविद्यालयीन तरूणीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी ९ जूनला सकाळच्या सुमारास घडली आहे.मोनू उर्फ शेजल अनिल सालुरकर (१८) रा. लागगुडा असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. बुधवारी दि.८ जुन ला माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांत परिक्षांचे ऑनलाई निकाल जाहीर झाले. या परिक्षेत शेजल उत्तीर्ण झाली आहे. शेजल ला १० वी मध्ये ९०% गुन मिळाले होते तर यावेळी १२ वी च्या परीक्षेत ६४% गुन मिळाले. अपेक्षे प्रमाणे गुण न मिळाल्याने नैराश्यातून आत्महत्या केली असावी अशी चर्चा सुरू आहे. शेजल चे वडील अनिल सुरपाम हे गवंडी काम करतात.
त्यांना दोन मुली असून एक मुलगी शिक्षण घेत आहे. मोनू उर्फ शेजल ने घेतलेल्या टोकाच्या निर्णयामुळे कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस तात्काळ घटनास्थळी पोहचले. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करिता ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. शेजल च्या आत्महत्या करण्यामागचे नेमके कारण काय? हे जाणून घेण्याचा पोलिस प्रयत्न करित असुन पुढील तपास सुरू आहे.