Chandrapur News: डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार यांचे दुःखद निधन | Be Media

Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur News Live,Maharashtra Live,Chandrapur Today,Chandrapur News IN Marathi,Maharashtra,
Chandrapur ● राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे माजी विभाग संघचालक तथा चंद्रपूरातील प्रसिध्‍द डॉक्‍टर श्री. सच्चिदानंद सांबशिव मुनगंटीवार यांचे आज दिनांक ३ जुन २०२२ रोजी सायं. ७.१४ वाजता निधन झाले. नागपूर येथील किंग्‍जवे या रूग्‍णालयात त्‍यांनी अखेरचा श्‍वास घेतला.
डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार हे मृत्‍युसमयी ९१ वर्षाचे होते. हृदय विकाराने त्यांचे निधन झाले. राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे विभाग संघचालक, लोकमान्‍य टिळक स्‍मारक मंडळाचे अध्‍यक्ष, चिन्‍मय मिशनचे अध्‍यक्ष, डॉ. हेडगेवार जन्‍मशताब्‍दी सेवा समितीचे अध्‍यक्ष अशा विविध जबाबदा-या त्‍यांनी समर्थपणे सांभाळल्‍या. १९६७ मध्‍ये त्‍यांनी भारतीय जनसंघातर्फे चंद्रपूर विधानसभेची निवडाणूक देखील लढली होती. 

विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार हे त्‍यांचे ज्‍येष्‍ठ चिरंजीव तर चंद्रपूरातील प्रसिध्‍द नेत्रतज्ञ डॉ. संदीप मुनगंटीवार हे त्‍यांचे कनिष्‍ठ चिरंजीव होत. त्‍यांच्‍या पश्‍चात दोन मुले, मुलगी सुचिता चकनलवार, स्‍नुषा, जावई, नातवंड असा मोठा आप्‍त परिवार आहे.

त्‍यांचे पार्थीव शनिवार दिनांक ४ जून २०२२ रोजी सकाळी १०.३० वा. चंद्रपूर येथे आणण्‍यात येईल. त्‍यांची अंत्‍ययात्रा सायं. ४.३० वा. त्‍यांच्‍या कस्‍तुरबा चौक निवासस्‍थानाहून निघेल. शांतीधाम येथे त्‍यांच्‍यावर अंत्‍यसंस्‍कार करण्‍यात येतील. 

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.