'
30 seconds remaining
Skip Ad >

Sharpshooter In Tadoba: नरभक्षी वाघाच्या बंदोबस्तासाठी ताडोबात शार्प शुटर, वडसा वनविभागाची शोध मोहीम सुरू - Batmi Express

0

Gadchiroli News,Desaiganj News,wadsa,Gadchiroli  Live News,Gadchiroli,Tiger Attack,Desaiganj,Gadchiroli Batmya,

गडचिरोली : देसाईगंज तालुक्यात दहशत निर्माण करणाऱ्या नरभक्षी वाघाला पकडण्यासाठी ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील शार्प शूटरची टीम ५ मे रोजी वडसा वनविभागात दाखल झाली आहे. या पथकासह वनविभागाच्या पथकाद्वारे वाघाला पकडण्याची युद्धस्थळावर शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.

वडसा वनविभागांतर्गत देसाईगंज तालुक्यात मागील १५ दिवसांच्या कालावधीत वाघाने हल्ला चढवून दोघांचा बळी घेतला आहे. दोन दिवसापूर्वीच उसेगाव जगंल परिसरात वाघाने एका युवकाच्या नरडीचा घोट घेतला. या घटनांमुळे तालुक्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, वाघाच्या भीतीपोटी अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतीकडे दुर्लक्ष केले आहे. अशातच नरभक्षी वाघाला पकडून दहशतीत जीवन जगणाऱ्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी वनविभागाने आता शार्प शूटरच्या पथकाला पाचारण केले आहे. या पथकाच्या माध्यमातून नरभक्षक वाघाची शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.

पथकात सहा सदस्यांचा समावेश

मागील काही दिवसांपासून वडसा वनविभागात दहशत निर्माण करून निष्पाप जीवांचा बळी घेणाऱ्या नरभक्षक वाघाला पकडण्याची मागणी सर्वच स्तरावरून केली जात होती. तसेच लोकप्रतिनिधींनी सुद्धा आक्रमक पवित्रा घेतला होता. अखेर वनविभागाच्या वतीने नरभक्षक वाघाला पकडण्यासाठी मंजुरी देण्यात आली. तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील शार्प शूटरची टीम वडसा वनविभागात दाखल झाली आहे. या पथकात एकूण सहासदस्य असल्याची माहिती वनविभागाने दिली आहे.

नागझिरा टीमचे चार दिवसांपूर्वी पासून बस्तान

नरभक्षी वाघाला पकडण्यासाठी गुरुवारी ताडोबा येथील शॉर्प शूटरची पथक वडसा वनविभागात दाखल झाले आहे. तसेच चार दिवसांपूर्वीच नागझिरा येथील १० सदस्यांचे जिल्ह्यात बस्तान मांडून आहेत. आता दोन्ही पथकांनी संयुक्तरित्या नरभक्षक वाघाला पकडण्याची मोहीम आरंभली आहे. मागील वर्षी गडचिरोली तालुक्यात नरभक्षक वाघाने दहशत माजवून १५ पेक्षा अधिक निष्पाप नागरिकांचे जीव घेतला होता. त्यावेळी सुद्धा नागझिरा टिम गडचिरोली वनविभागात दाखल झाली होती. परंतु, नरभक्षक वाघ न मिळाल्यामुळे संबंधित पथक परतले होते.

२५ ट्रॅप कॅमेऱ्यातून वाघावर नजर

वडसा वनविभागातील नरभक्षक वाघाला पकडण्यासाठी नागझिरा व ताडोबा येथील पथकाला पाचारण करण्यात आले आहे. तसेच वनविभागाद्वारा वाघावर नजर ठेवण्यासाठी वाघ बाधित क्षेत्रात जवळपास २५ ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत. तसेच २ पिंजरे सुद्धा जंगलपरिसरात लावले आहेत. सोबतच वनविभागाच्या वतीने जनजागृती करण्यासाठी गावोगावी बॅनर लावले जात आहेत. वाघाचा सहवास असलेल्या परिसरात न जाण्याचे आवाहन केले जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×