Big Accident in Ahmednagar: कंटेनरची दुचाकी आणि रिक्षाला धडक; सहा जणांचा जागीच मृत्यू - Batmi Express

Ahmednagar,Ahmednagar Live,Ahmednagar News,Ahmednagar Accident,Accident,Accident News,Accident News Live,Maharashtra,

Ahmednagar,Ahmednagar Live,Ahmednagar News,Ahmednagar Accident,Accident,Accident News,Accident News Live,Maharashtra,

अहमदनगरच्या कोपरगाव तालुक्यात भीषण अपघात झाला. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी झाले आहेत. कंटेनरने प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाला धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला.  या अपघातातील मृतांमध्ये दोन विद्यार्थींनींचा समावेश आहे. कोपरगाव तालुक्यातील मुंबई-नागपूर महामार्गावर कंटेनरने समोरुन येणाऱ्या मोटारसायकलला कट मारुन  प्रवाशी वाहतूक करणाऱ्या रिक्षास जोराची धडक दिली. 

धडक इतकी जोरदार होती की  रिक्षामधील ६ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर रिक्षातील प्रवाशांसह मोटारसायकलवरील तिघे, असे ७ जण गंभीर जखमी झाले आहेत.

दरम्यान, सर्व जखमींवर जवळच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर मृतांमध्ये दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनींचा देखील समावेश आहे. या दुर्दैवी घटनेमुळे कोपरगाव परीसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.