तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

देसाईगंज: जंगलात फिरायला गेलेल्या प्रेमीयुगुलांवर वाघाचा हल्ला; युवक ठार तर युवती गंभीर जखमी - Batmi Express

Gadchiroli News,Desaiganj News,wadsa,Gadchiroli Live News,Gadchiroli,Tiger Attack,Desaiganj,Gadchiroli Batmya,

Desaiganj,Desaiganj News,wadsa,Gadchiroli,Gadchiroli  Live News,Gadchiroli Batmya,Gadchiroli News,Tiger Attack,

गडचिरोली:- गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाघांचे माणसांवर हल्ले करण्याच्या घटना वारंवार घडत आहे. वाघाच्या हल्ल्यात अनेकांचा हकनाक बळी गेला आहे. अशीच एक घटना गडचिरोलीमध्ये घडली आहे. मैत्रिणीसोबत फिरण्यासाठी आलेल्या तरुणावर वाघाने हल्ला केला. या हल्ल्या तरुणाचा मृत्यू झाला आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील उसेगावच्या जंगलात ही घटना घडली आहे. अजित नाकाडे असं मृत तरुणाचे नाव आहे. देसाईगंज तालुक्यात कोरेगाव चोप इथं राहणार अजित नाकाडे हा आपल्या मैत्रिणीसोबत उसेगावच्या जंगलात फिरण्यासाठी आला होता. जंगलात फिरत असताना त्यांना काही स्थानिकांनी पाहिले आणि हे वाघाचे क्षेत्र आहे, पुढे जाऊ नका असा सल्ला दिला होता.
पण, ग्रामस्थांना सल्ला झुगारून अजित आपल्या मैत्रिणीसोबत जंगलात फिरण्यासाठी गेला. जंगलात एका ठिकाणी बसलेले असताना अचानक वाघाने दोघांवर हल्ला केला. वाघाने अचानक हल्ला केल्यामुळे दोघांचा
एकच गोंधळ उडाला. जीव वाचवण्यासाठी दोघांनी प्रयत्न केला.
पण, वाघाने तोपर्यंत अजितचा पडशा पाडला होता. तर त्याची मैत्रीण जखमी झाली जंगलात आरडाओरडा ऐकू आल्यामुळे ग्रामस्थांनी धाव घेतली. त्यामुळे वाघाने जंगलात धूम ठोकली.
घटनेची माहिती तातडीने वनअधिकाऱ्यांना देण्यात आली. वनअधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत अजितचा मृतदेह जंगलातून आणण्यात आला आहे, तर जखमी तरुणीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.