मुल:- शेतात काम करण्यासाठी गेलेल्या शेत मजुरावर अचानक वाघाने हल्ला ( Tiger Attack ) करून ठार केल्याची घटना आज सकाळी आठ वाजताच्या सुमारास काटवन येथील कक्ष क्रमांक ७५६ मधील नाल्याजवळ घडली आहे. वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या मृतकाचे नाव रामभाऊ कारु मरापे ( वय ४३ ) असे आहे. ( Chandrapur Tiger Attack )
या घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या चमुने घटनास्थळी जावुन पंचनामा केला व पुढील तपास करीत आहेत.
दरम्यान वाघाच्या हल्यात ठार झालेल्या मृतक रामभाऊ मरापे याच्या कुंटूबियास वनविभागा तर्फे आर्थिक मदत देण्यात आल्याची माहीती वन परीक्षेञ आधिकारी घनश्याम नायगमकर यांनी दिली आहे.