तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

4 महिलांवर अस्वलांचा हल्ला..! तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या मजुरांवर अस्वलांच्या कळपाचा हल्ला - Batmi Express

Gadchiroli,Gadchiroli Batmya,Gadchiroli Live News,kurkheda,Gadchiroli live,Gadchiroli News,Gadchiroli News IN Marathi,

Gadchiroli,Gadchiroli Batmya,Gadchiroli  Live News,kurkheda,Gadchiroli live,Gadchiroli News,Gadchiroli News IN Marathi,

कुरखेडा
:- तेंदूपत्ता संकलनाकरिता जंगलात गेलेल्या महिला मजुरांवर अचनाक अस्वलांच्या कळपाने हल्ला चढविला. ही घटना आज(दि. ७) सकाळी ७ च्या सुमारास घडली असून यात ४ महिला मजूर गंभीर झाल्या आहेत.

कुरखेडा तालुक्यातील दादापूर येथील महिला-पुरुष अशा १४ जणांचा गट गावापासून ५ किमी अंतरावर असलेल्या कवऱ्याल झट्याल जगंलात तेंदूपत्ता संकलनाकरीता गेले होते. संकलनाचे काम सूरू असतानाच अचानक ५ च्या संख्येत असलेल्या अस्वलाचा कळपाने या मजुरांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात सिमा रतिराम टेकाम (२१), लता जिवन मडावी (३५), पल्लवी रमेश टेकाम (२५) व रमशीला आनंदराव टेकाम (३८) या चार महिला गंभीर जखमी झाल्या.

दरम्यान, आरडाओरड ऐकताच आसपासचे मजूर मदतीला धावून आले व अस्वलांच्या कळपाने घटनास्थळावरून पळ काढला. सर्व जखमींना तत्काळ उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरता रवाना करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच रामगडचे वनरक्षक बि.डी. रामपूरकर मालेवाडाचे वनरक्षक बाबूराव तुलावी, डी.एम. उईके यांनी रुग्नालयाला भेट देत जखमींची विचारपूस केली व नियमाप्रमाणे उपचारार्थ आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.