चंद्रपूर:- जिल्ह्यात गेले 16 दिवस कोरोनाचा एकही रुग्ण नव्हता. आता वृद्ध महिला पॉझिटिव्ह सापडली. ती महिला बल्लारपूर तालुक्यातील रहिवासी आहे. संबंधित महिलेच्या घरी वृद्ध पती-पत्नी वास्तव्याला आहेत. कोरोनाबाधित झाल्याची पुष्टी झाली. त्यानंतर महिलेला जिल्हा रुग्णालय परिसरातील कोविड उपचार इस्पितळात दाखल केले. महिलेच्या नमुन्यातील कोरोनाच्या नेमक्या व्हेरियंटबाबत आरोग्य यंत्रणा पाठपुरावा करीत आहे. (CoronaVirus Back In Chandrapur ) ( CoronaVirus Back In Chandrapur 2022 )
नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. देशात काही ठिकाणी रुग्णसंख्या वाढत आहे. अशात हा रुग्ण सापडला असल्यानं चंद्रपूर जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आलंय. लक्षणं आढळल्यास पुन्हा तपासणी करण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय.