'
30 seconds remaining
Skip Ad >

गडचिरोली शहरात होणारा बालविवाह एक दिवसाआधी थांबविला | Batmi Express

0

Gadchiroli,Gadchiroli  Live News,Gadchiroli Batmya,Gadchiroli live,Gadchiroli News,Gadchiroli Crime,crime,Maharashtra,

गडचिरोली
, 29 मे :- शहरातील तेली वार्डात 26 मे 2022 रोज गुरुवार ला एक बालविवाह होणार आहे अशी तक्रार पोलीस स्टेशन गडचिरोली येथे करण्यात आली. लगेच सायंकाळी 8 वाजता पोलीस स्टेशन गडचिरोली, जिल्हा बाल संरक्षण टीम गडचिरोली व चाईल्ड लाईन टीम यांनी सदर बालविवाह रोखण्याकरीता बालिकेचे घर गाठले व बालकाची जन्म पुरावा तपासणी करून, बालक 18 वर्षाखालील असल्याची खात्री पटल्यानंतर लगेच बालिकेचे व कुटुंबाचे समुपदेशन करण्यात आले.

मुलिकडचे व मुलाकडचे हे दोन्ही मंडळी सुध्दा गडचिरोली शहरातील असून त्यांचा बाल विवाह दुसऱ्या दिवशी गडचिरोली येथे होणार आहे, अशी गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस विभाग, जिल्हा बाल संरक्षण कक्ष गडचिरोली व चाईल्ड लाईन टीम यांनी सदर बालिकेच्या घर गाठून मुलीच्या आईकडून मुलीचे 18 वर्ष होइपर्यंत बालिकेचे विवाह करणार नाही, असे हमी पत्र लिहून घेतले व बालिकेचे समुपदेशन करण्यात आले.

जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अविनाश गुरनुले यांचे उपस्थितीत वधू पक्ष यांना एकत्र बसवून बालविवाह बाबतचे दुष्परिणाम व कायदा नुसार होणारी कार्यवाही याबाबत उपस्थित कुटूंबातील सदस्यांना माहिती देण्यात आली.

सदर कार्यवाही जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रकाश भांदककर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अविनाश गुरनुले तसेच पोलीस स्टेशन गडचिरोली येथील पूनम गोरे साहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक चव्हाण, जिल्हा समन्वक चाईल्ड लाईन दिनेश बोरकुटे, बाल संरक्षण अधिकारी कवेश्वर लेनगुरे, सामजिक कार्यकर्ते जयंत जथाडे, क्षेत्र कार्यकर्ता रवींद्र बंडावार, चाईल्ड लाईन टीम मेंबर अविनाष राऊत यांनी केली.

बाल कल्याण समिती गडचिरोली यांच्याकडे बलिकेला सादर करून हमीपत्र लिहून घेण्यात आले. 15 वर्ष 4 महिने वय असणाऱ्या बालिकेचा बालविवाह थांबवण्यात जिल्हा बाल संरक्षण टीम, पोलीस विभाग, चाईल्ड लाईन गडचिरोली यांना यश आले हे विशेष.

अशाप्रकारे जिल्ह्यात कुठेही बालविवाह होत असल्यास जिल्हा बाल संरक्षण कक्ष येथे व चाइल्ड लाईन टोल फ्री क्रमांक 1098 या क्रमांकावर बाल विवाह बाबत संपर्क करावे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×