Satellite's metal ring fell from space in Chandrapur | सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी गावात पडली सँटेलाइटच्या धातुची मोठी रिंग - Batmi Express

Satellite's metal ring fell from space in Chandrapur,Chandrapur,Chandrapur News,Chandrapur Live,Chandrapur News IN Marathi,Chandrapur Today,

Satellite's metal ring fell from space in Chandrapur,Chandrapur,Chandrapur News,Chandrapur Live,Chandrapur News IN Marathi,Chandrapur Today,
Satellite's metal ring fell from space in Chandrapur

चंद्रपूर : सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी या गावात रात्री 8 वाजताच्या सुमारास प्रकाश व आवाजासह  सँटेलाइटची 8 ते 10 फुटाची धातूची रिंग पडल्याने एकच खळबळ उडाली. रिंग पडताच लोकांची एकच गर्दी झाल्याने पोलिस ठाण्यात जमा करण्यात आली आहे.

शनिवारला सायंकाळी 7 ते 8 वाजताच्या सुमारास आकाशातून उल्का वर्षाव झाल्यासारखे रांगेत लाल गोळे जमिनीच्या दिशेने आले असल्याचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात दिसले. आकाशात लाल गोळे बघून लोकांनी कुतूहलाने त्याकडे बघितले. सोशल मिडीयावर त्या दृशाचे अवलोकन केले.

Satellite's metal ring fell from space in Chandrapur,Chandrapur,Chandrapur News,Chandrapur Live,Chandrapur News IN Marathi,Chandrapur Today,
Satellite's metal ring fell from space in Chandrapur

मात्र रात्री 8 वाजताच्या सुमारास सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी गावातील भरवस्तीत एका रिकाम्या फ्लॉटवर येथे एक मोठी धातूची रिंग पडली. त्या वेळेत त्या ठिकाणाजवळ ७ ते ८ लोक उभे होते सुर्देवाने जिवीत हानी टळली हे विशेष. ही रिंग आकाशातून कोसळलेल्या सँटेलाइटची असल्याचे सांगण्यात येत आहे. आकाशातून पडलेली ही रिंग बघण्यासाठी नागरिकांची गर्दी उसळली होती.

सिदेवाही पोलिस ठाण्यात रिंग ट्रॅक्टरच्या सहाय्याने नेवून जमा करण्यात आली.  १० ते १२ फूट लांबीची ही रिंग आहे. सदर अवकाशातून पडलेली रिंग सॅटेलाईटची असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. पुढील चौकशीअंती स्पष्टता समोर येईल.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.