मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मागे ईडी (ED) चौकशीचा ससेमिरा लागला असताना आता एक मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर ईडीनं कारवाई केेली आहे. ईडीनं संजय राऊत यांचा दादरमधला एक फ्लॅट तर अलीबाग मधील ८ प्लॅाट जप्त केला आहे. (Sanjay Raut Assets in Alibag confiscated by ED)
पत्राचाळ घोळाटा प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणात प्रवीण राऊत यांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणातील पैशांचा उपयोग संजय राऊत यांनाही झाला असल्याचे ईडीकडे पुरावे आहे. त्यानंतर ही जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.
या प्रकरणात संजय राऊत यांना अटक करण्याची मागमी भाजपा आमदार निलेश राणे यांनी केली आहे. संजय राऊत यांनी ईडी कार्यालयात ५५ लाख रुपये परत केले होते. अशी माहिती किरिट सोमंय्य़ा यांनी दिली आहे. दोन महिने संजय राऊत यांची धावपळ, ईडीवर आरोप, किरिट सोमय्या आणि कुटुंबीयांवर आरोप ही त्यांची मानसिक अवस्था समजू शकतो, असे किरिट सोमय्या यांनी सांगितले आहे.