मुख्यमंत्रीसाहेब, तुम्ही कुणावर प्रेम केलं होतं का हो?, प्रेमात बुडालेल्या युवकाचं मुख्यमंत्र्यांना पत्र - Be Hingoli

Hingoli,Hingoli Marathi News,Hingoli News,Mumbai,Mumbai Live,Maharashtra,

Hingoli,Hingoli Marathi News,Hingoli News,Mumbai,Mumbai Live,Maharashtra,

एका तरुणानं मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय झाला असून हे पत्र सोशल मीडियावर चांगलंच धुमाकूळ घालत आहे. मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं हे पत्र साध्या कागदावर असून त्यावर कुणाचंही नाव नाही.  मात्र हे पत्र हिंगोली जिल्ह्यातील एका युवकानं लिहिलं असल्याची माहिती आहे. या पत्रातून त्यांनी प्रेम कथा मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आपली प्रेम प्रति भावना व्यक्त केली आहे. नेमके ते पत्र कुणाचे आहे हे मात्र अद्याप कळू शकले नाही.

शेतकरी होऊन प्रेम करणं खरंच चुकीचं असतं का...? असा प्रश्न एका प्रेम करणाऱ्या युवकाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केला आहे. या पत्रात म्हटले की खरंतर तुम्हाला भेटून खूप रडावं वाटत आहे. 

पत्रात युवकानं म्हटलं आहे की, उद्धवसाहेब आजपर्यंत तुम्ही सगळ्यांचं ऐकून घेत आलात. त्यांचे प्रश्न सोडवता. माझं काय? या पुरोगामी महाराष्ट्रात प्रेमात आत्महत्या करावी लागत असेल तर मी प्रेमाचा धिक्कार करतो आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर द्याल अशी वाट पाहतो. अन्यथा जगातून निघून जाण्याव्यतिरिक्त माझ्याकडे पर्याय नाही. उत्तर कधी देत आहे साहेब, वाट पाहतोय, असं पत्रात म्हटलं आहे.

पत्रामध्ये लिहिलं आहे की, साहेब लिहिताना खूप दुःख होत आहे. साहेब तुमचं महाराष्ट्रावर खूप प्रेम आहे. तुम्ही कधी कुणावर प्रेम केलं होत का हो? आयुष्यात कधी तरी केलं असेल उत्तर द्या. प्रेम हे धन-दौलतीचे मोहताज असते का हो...? मी पण कोणावर तरी प्रेम केलं होतं पण शेत जमीन कमी असल्याने प्रेमाला विरोध असं असतं का हो...? असा सवाल युवकानं पत्रातून केलाय. 

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.