चिखली (वा.) : तिरोडा तालुक्यातील परसवाडा – कवलेवाडा मार्गाने चार वाहनांमध्ये जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्यांना तिरोडा पोलिसांनी अटक केली. ही कारवाई २ एप्रिल रोजी करण्यात आली. यात चार वाहनांसह २१ लाख ५२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
हे सुद्धा वाचा
पसरवाडा ते कवलेवाडा मार्गाने जनावरांची अवैधरित्या कत्तलीसाठी वाहतूक करणाऱ्या पिकअप वाहन क्रमांक एमएच ३५/ एजे १४५३, एमएच ३५/ एजे ०९८३, एमएच ३५/ के २०९१ एमएच ३५/ के ३३४९ तिरोडा पोलिसांनी पकडले. वाहनांची तपासणी केली असता त्यात १९ जनावरे आढळून आले. यावेळी आरोपी लक्ष्मण तिलकचंद खरोले (वय ३३), राजकुमार नानू बघेले (वय ३२), महेश झाडुलाल सिहारे (वय २६), अभिमन्यू तिलकचंद खरोले (वय ३८), रेखचंद भाऊलाल खरोले (वय ४०) सर्व रा. देवरी यांना अटक करण्यात आले. पोलिसांनी १९ जनावरे किंमत १० लाख रुपये व चार वाहन किंमत ११ लाख ५२ हजार असा एकूण २१ लाख ५२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी तिरोडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलिस नायक चोपकर करत आहेत.