मुल:- मुल येथील युग महेश जेंगठे या पाच वर्षीय बालकांचा कुलरचा शॉक लागून दुर्देवी मृत्यू झाल्यांची घटना घडली. या दुर्देवी घटनेमुळे जेंगठे परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. युग हा मूल येथील सेंट ॲनेस स्कुलला केजी 2 मध्ये शिकत होता.
Read Also: कोरपना: मोबाईलवर बोलता-बोलता तिसऱ्या मजल्यावरून पडून एकाचा मृत्यू
एक दिवसापूर्वीच महेश जेंगठे यांनी कुलर लावला होता. आज दुपारी 12 वाजताचे दरम्यान युग खेळता- खेळता कुलरचे स्टॅंडला जावून पकडला व तिथेच शॉक लागून जागेवरच पडला. ही बाब घरच्यांच्या लगेच लक्षात येताच युगला मूल येथील उपजिल्हा ग्रामिण रूग्णालयात हलविले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.
Read Also: देसाईगंज: चोप येथे धान पिकात शेतकऱ्याचा मृतदेह आढळला
युग यांचे निधनाची बातमी शहरात वार्यासारखी पसरताच अनेकांनी महेश जेंगठे यांचे घरी गर्दी केली. मूल येथील प्रतिष्ठीत युवक, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी महेश जेंगठे पदाधिकारी असून त्यांना दोन मुले आहेत. युग हा लहान मुलगा होता. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.