बापरे! नवरदेवाच्या वरातीत नाचण्यामुळे झाला उशीर अन्... वधुपित्याने मुलीचे लग्न दुसऱ्याच मुलाशी दिले लावून - Be Network

लग्न मुहूर्तावर लागत नसल्याचे लक्षात आल्यानंतर वधू पित्याने नवरदेवाची मंडपात वाट न बघता नात्यात असलेल्या दुसऱ्या मुलाशी आपल्या मुलीची लग्नगाठ बांधल.

Buldana,Buldana News,Buldana Live,Maharashtra,Maharashtra Live,

बुलढाणा
: आजकाल नवरदेवाच्या वरातीत नाचण्याचा मनमुराद आनंद त्याचे नातेवाईक आणि मित्रमंडळी घेत असतात. परंतु, हीच गोष्ट नवरदेवाला महागात पडली. आणि चक्क नवरदेवाला लग्नापासून वंचित राहावे लागले. लग्न मुहूर्तावर लागत नसल्याचे लक्षात आल्यानंतर वधू पित्याने नवरदेवाची मंडपात वाट न बघता नात्यात असलेल्या दुसऱ्या मुलाशी आपल्या मुलीची लग्नगाठ बांधली आहे. एखाद्या चित्रपटाच्या प्रसंगात घडेल अशी घटना बुलढाण्यात घडली.

दिनांक २२ एप्रिलला दुपारी ४ वाजताचा मुहूर्त होता. सुंदर मंडप सजला. वऱ्हाडी मंडळी जमली. वधू लग्नासाठी नटून थटून तयार झाली. सर्वत्र आनंदी आनंद असतांना नवरदेव गावात उशिरा पोहोचला. अन् दारुड्या वऱ्हाडी मंडळींसोबत नाचत बसला. लग्न मुहूर्तावर लागत नसल्याचे पाहून वधू पित्याने नवरदेवाची वाट न बघता मंडपातील दुसऱ्या मुलाशी कन्येचा विवाह लावून दिला. तर, वऱ्हाडी मंडळींसोबत धिंगाणा घातला म्हणून प्रस्तावित नवरदेवाला चोप देऊन माघारी पाठविण्यात आले.

हा आगळावेगळा लग्न सोहळा बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर पांग्रा गावात पार पडला. लग्नाची सर्व तयारी झालेली असतांना नवरी आणि वऱ्हाडी मंडळी लग्नमंडपात येऊन तयार होती. त्यावेळी वधूकडील मंडळींनी उशीर का झाला अशी विचारणा केली या कारणावरून दोन्ही मंडळींमध्ये वाद झाला. तसेच, धक्काबुक्की सुद्धा झाली. वधुकडील मंडळींनी वराकडील मंडळींना बेदम मारहाण केली. अन् नवरदेवाला आल्या पावली परत पाठवलं. काही काळानंतर मंडपात उपस्थित असलेल्या नात्यातीलच एका मुलाशी बोलणी करण्यात आली. आणि वेळावरच्या नवरदेवाशी वधू पित्याने आपल्या मुलीचा विवाह केला.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.