आरमोरी :- पाच वर्षापासून प्रेम करणाऱ्या प्रेमियुगलांची विवाह करून संसार थाटण्याची खुपचं इच्छा होती. मात्र मुलीच्या कुटुंबीयांकडून लग्नाला विरोध असल्याने तंटामुक्त समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत या प्रेमियुगलांचा विवाह लावून दिला.
अरमोरी तालुक्यातील नरचुली येथील चेतन विश्वनाथ मडावी यांचे गावातीलच माधुरी दुर्योधन उईके या मुलीसोबत पाच वर्षापासून प्रेमसंबंध सुरू होते. रितीरिवाजाप्रमाणे आपण लग्न करून आपला संसार थाटावा, अशी त्यांची इच्छा होती. परंतु मुलीच्या कुटुंबीयाकडून लग्नाच विरोध होता. प्रेमयुगलानी शेवटी तंटामुक्त समितीकडे धाव घेऊन आपली आपबीती सांगितली. समितीने पुढाकार घेऊन दोघांचे वय नियमानुसार योग्य आहे काय? याकरिता कागदपत्राची शहानिशा केली व दोघांचीही विचारपूस करून दोघांच्याही सहमतीने महात्मा गांधी तंटामुक्तच्या माध्यमातून रविवारी सायंकाळच्या सुमारास वीर बाबूराव शेडमाके आवारामध्ये लग्न लावून देण्यात आले.
- Read Also: ब्रम्हपुरी: विद्यार्थ्याने वाघाला मोबाईल फेकून मारला...मोबाईल वाघाला लागताच काय झालं असेल?
यावेळी तंमुस अध्यक्ष विलास आलाम, पोलीस पाटील रामचंद्र उईके, ब्रह्मानंद सराटे, योगाजी टेंभुर्णे, पांडुरंग मडावी, पितांबर गेडाम, विश्वनाथ सडमाके, हिरामण पेंदाम, विकास सडमाके, अमर उईके, सौरव आलाम, अनिता मडावी आदींसह गावातील नागरिक उपस्थित होते.