सिंदेवाही: अंगणात झोपलेल्या इसमावर वाघाचा हल्ला ७० वर्षीय इसम जागीच ठार.! | Batmi Express

Sindewahi,Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur News Live,Chandrapur Today,Maharashtra,Chandrapur Tiger Attack,

सिंदेवाही
सिंदेवाही वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या सरडपार चक येथील अंगणात झोपलेल्या इसमावर बिबट्याने हल्ला करून ठार केल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली. मृतकाचे नाव शालिक बुधा नन्नावरे (70) असे आहे.

उन्हाळ्याच्या दिवसात गर्मी मुळे त्रस्त झालेले ग्रामीण भागातील लोक बाहेर अंगणात झोपतात. अंगणात झोपणे शालिक बुधा नन्नावरे च्या जीवावर बेतले असल्याची घटना उजेडात आली आहे. अंगणात रात्रौच्या सुमारास तो बाहेर अंगणात झोपलेला असताना मध्यरात्रीनंतर बिबट्यांनी हल्ला करून ठार केल्याची घटना घडली. 
घटनेची माहीती मिळताच सिंदेवाही वनविभाग व पोलीस घटना स्थळी दाखल होत घटनेचा पंचनामा करून मृतकास शवविच्छेदना साठी हलविण्यात आले.
गाव परिसरात हिस्त्र पशूंचा वावर हाेत असल्याने सिंदेवाही तालुक्यात वाघ - बिबट हिस्त्र पशूंची दहशत निर्माण झाली असून वनविभागाने त्वरीत बंदोबस्त करावा अशी मागणी जनतेत केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.