'
30 seconds remaining
Skip Ad >

धक्कादायक! बीडच्या लाडेवडगाव शिवारात जळालेला मृतदेह आढळला…

0

 


बीड : बीड जिल्ह्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. काल अंबाजोगाईच्या शेपवाडीमध्ये पुजाऱ्याच्या खून झाला होता. खुनाची घटना ताजी असतानाच बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात जळालेल्या अवस्थेत मानवी सांगाडा आढळून आल्यामुळे खळबळ उडाली असून हा प्रकार घातपाताचा असण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून घटनास्थळी अंबाजोगाईच्या अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर तसेच युसुफ वडगाव पोलीसांनी धाव घेतली आहे.

केज तालुक्यातील आडस – होळ रस्त्यावरील वेदांत साधनास्थळा जवळ काही अंतरावर अनोळखी व्यक्तीचा जळालेला मृतदेह आढळून आला . सदर प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच युसुफ वडगाव पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला आहे. सदरील व्यक्तीला घटनास्थळीच कडब्याच्या पेंढ्याने जाळण्यात आले असावे असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

पोलीस तपासात याबाबतीत खुलासा होईल. मृतदेह पुर्णपणे जळालेला असल्याने ओळख पटविण्याचे पोलीसांसमोर आव्हान असणार आहे. मृतदेह नेमका महिलेचा की, पुरुषाचा याचा अंदाजही येत नाही.दरम्यान अंबाजोगाई येथील पुजाऱ्याच्या खुनाची घटना ताजी असतानाच ही घटना घडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×