सावली : पोलीस स्टेशन सावली हद्दीतील व्याहाड ते गडचिरोली रोडवरील चुनारकर पेट्रोलपंप येथे २९ मार्च २०२२ रोजी रात्री दरम्यान अज्ञात इसमांनी पेट्रोल पंपावरील डिझेल टॅंकच्या होलमध्ये पाईप टाकून १ हजार ८९ लिटर डिझेल चोरी झाल्याचे पेट्रोलमालकास लक्षात आले. ही घटना माहित होताच रोहणकर पेट्रोलपंप येथे सुद्धा २७ मार्च २०२२ रोजीच्या रात्रीदरम्यान अशाचप्रकारे १ हजार ६४० लिटर डीझेल काढून चोरी झाल्याचे रोहणकर पेट्रोलपंप मालकास लक्षात आले. दोन्ही प्रकरणात एकूण २ हजार ७२१ लिटर डिझेल फी २,६७,२३४ रु. चोरी झाल्यावरून फिर्यादीने १ एप्रिल २०२२ रोजी दिलेल्या रिपोर्टनुसार अज्ञात आरोपीविरुद्ध भादवी कलम ३७९,३४ गुन्हा नोंद करण्यात आला.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक अरविंद साळवे, अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी मल्लकार्जुन इंगळे, पो. स्टे. सावली ठाणेदार आशिष बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप. नि. शशिकर चिचघरे, सहा. फौजदार रामकिसन बोधे, नापोका केवल तुरे, करमचंद दुर्गे पोलीस कॉन्स्टेबल धिरज पिंदुरकर यांनी केली.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.