पती आणि मुलासह ठार मारून आत्महत्या करण्याची धमकी देऊन विवाहितेवर केला बलात्कार - Be Pimpri

Be
0

crime,crime news,crime updates,Pimpri,Pimpri Crime,Maharashtra,

पिंपरी
: एक नराधमाने विवाहितेवर बलात्कार करून पती, मुलासह महिलेला ठार मारून स्वत: आत्महत्या करण्याची धमकी दिली. ०५ जून २०२० ते ०५ एप्रिल २०२२ या कालावधीत खराबवाडी, खेड येथे ही खबळजनक घटना घडली.

याप्रकरणी पिडीत महिलेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून आरोपी इसमाविरोधात भारतीय दंड विधान कलम ३७६, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे बलात्काराचा गुन्हा नोंदविला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी महिलेच्या इच्छे विरोधात शरीर संबंध ठेवले. याबाबत कुणालाही सांगितल्यास किंवा पोलिसांत तक्रार दिल्यास, महिलेसह तिचा पती व मुलाला ठार मारून स्वत: आत्महत्या करण्याची धमकी दिली. तसेच, वारंवार फोन करून धमकी दिली असे फिर्यादीत म्हटले आहे. चाकण पोलीस या घटनेविषयी अधिक तपास करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->