मार्च ०२, २०२२
0
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदानानंतर, म्हणजे ७ मार्च नंतर देशातील पेट्रोल-डिझेलच्या किंमतीचा भडका उडण्याची शक्यता आहे.
रशिया-युक्रेन युद्धामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या किंमतीने ११० डॉलर प्रति बॅरेलचा टप्पा ओलांडला आहे. त्याचा परिणाम देशातील इंधनावर होण्याची शक्यता आहे. देशातील पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये ९ ते १० रुपयांची वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू असल्याने त्याचा परिणाम कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर होत आहे. क्रूड ऑइल उत्पादक देशांमध्ये रशिया हा प्रमुख देश आहे. युरोपच्या एकूण मागणीपैकी एकूण ३५ टक्के पुरवठा हा रशियाकडून होतो. भारतालादेखील रशियाकडून मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाचा पुरवठा होतो. युद्धाचा परिणाम हा या सप्लाय चेनवर होणार असून आगामी काही दिवसात दर आणखी भडकण्याची शक्यता आहे.
*७ वर्षा नंतर पहिल्यांदा वाढेल एवढे दर*
कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये २०१४ नंतर पहिल्यांदाच विक्रमी वाढ झाली असून ही किंमत ११० डॉलर प्रति बॅरेल इतकी झाली आहे.
*तोट्यात आहेत तेल कंपन्या??*
तेलाच्या किंमती वाढल्याने सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्या इंडियन ऑयल कॉरपोरेशन, भारत पेट्रोलियम व हिंदुस्तान पेट्रोलियमला पेट्रोल आणि डीजल वर ५.७ रुपये प्रति लिटर तोटा सहन करावा लागत आहे. जे.पी. मॉर्गन नुसार, तेल मार्केटिंग कंपनीना सामान्य मार्केटिंग प्रॉफिट मिळवण्यासाठी होलसेल तेलाच्या किमती मध्ये ९ रुपये प्रति लिटर किंवा १० टक्के वाढ करण्याची गरज आहे. घरगुती पातळीवर इंधनाच्या दरामध्ये कोणताच बदल केला गेला नाहीये.
अन्य ॲप्सवर शेअर करा
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.