नवी दिल्ली : जनता आधीच महागाईंन होरपळून जात असताना, आता पेट्रोल आणि डिझेलचा भडका उडाला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात ८० पैशांनी वाढ करण्यात आली. सलग नवव्या दिवशी इंधनाच्या दरात वाढ झाली आहे. बुधवारच्या वाढीबरोबरच डिझेलने देशात अनेक ठिकाणी शंभरी पार केली. आता नव्या दरानुसार मुंबईत एक लिटर पेट्रोलची किंमत ११६.७२ रुपये झाली, तर डिझेल १००.९४ रुपये प्रतिलिटर झाले. गेल्या नऊ दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत एकूण सहा रुपये ८० पैशांची वाढ झाली आहे.
ज्या महागाईची भीती सर्वसामान्यांना होती, ते अखेर खरे ठरताना दिसत आहे. देशातील पाच राज्यातील निवडणुका होताच पेट्रोल डिझेल व महागाईचा आगडोंब होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता, तो अंदाज खरा ठरत आहे. पेट्रोल-डिझेल दरात मागील सलग ९ दिवसांतील वाढ आहे. पेट्रोल डिझेल ८० पैशांनी महागलं आहे, त्यामुळं वाहनदारांना याचा मोठा फटका बसत असून, सामान्य जनता महागाईंन होरपळून गेली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) कच्च्या तेलाच्या दरांत (Crude Oil Price) खूपच वाढ झाली आहे. रशिया आणि युक्रेन युद्धामुळे (Russia Ukraine War) कच्च्या तेलाच्या आयात-निर्यातीवर परिणाम झाला आहे. ज्याचा परिणाम पेट्रोल – डिझेलच्या किमतींवर होत आहे.
दरम्यान, २२ मार्चपासून देशात इंधन दरवाढ सुरुच आहे. मागील ९ दिवसातील इंधन दरवाढ आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. यावरुन विरोधीपक्षाने केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले. वाढत्या इंधनाच्या दरावर केंद्र सरकारने स्पष्टीकरण दिले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मंगळवारी राज्यसभेत इंधनाच्या वाढत्या किंमती आपल्यासाठी एक मोठं आव्हान असल्याचं म्हणाले. अर्थ विधेयकावर चर्चा करताना सीतारमण यांनी म्हणाल्या की, २०१०-११ पासून २०२२ पर्यंत पेट्रोल आणि डिझेलवरील सेससाठी केंद्र सरकारने ११ लाख कोटी रुपये खर्च केलेत. दररोजची इंधनवाढ ही सामान्य माणसाला जगणे मुश्किल करत आहे. त्यामुळं इंधन दरवाढीमुळं आता गाड्या वापरायचा की नाही असा संतप्त सवाल लोकं उपस्थित करत आहेत.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.