HSC Chemistry Paper Leak: बारावीचा केमिस्ट्री पेपर फुटला, पेपरफुटी प्रकरणी शिक्षकाला अटक, पुन्हा रॅकेट सापडणार का? याची पोलिसांकडून जोरदार चौकशी सुरु - Batmi Express

HSC Chemistry Paper Leak,HSC Board,HSC 2022 News,HSC Board Exam,HSC Board Exam 2022,HSC Exams 2022,Education,Maharashtra,

HSC Chemistry Paper Leak,HSC Board,HSC 2022 News,HSC Board Exam,HSC Board Exam 2022,HSC Exams 2022,Education,Maharashtra,
HSC Chemistry Paper Leak: बारावीचा केमिस्ट्री पेपर फुटला, पेपरफुटी प्रकरणी शिक्षकाला अटक

मुंबई (
HSC Chemistry Paper Leak: सध्या बारावीच्या परीक्षा सुरु आहेत. मुंबईत बारावीचा केमस्ट्रीचा पेपर फुटल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. दरम्यान या प्रकरणी  मुकेश धनसिंग यादव या प्रोफेसरला विलेपार्ले पोलिसांनी अटक केली. मुकेशची मालाड परिसरात एक खासगी शिकवणी असून त्यानेच परीक्षेपूर्वी व्हॉट्सअप ग्रुपवर हा पेपर व्हायरल केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यामुळं पहिला आरोपी पोलिसांच्या ताब्यात आला असून, अधिक तपास आणि चौकशी पोलीस करतायेत. विलेपार्ले येथील साठे महाविद्यालयात बारावी परीक्षेचे एक सेंटर असून तिथेच तक्रारदार हे सुपरवायझर म्हणून कार्यरत होते. ( HSC Chemistry Paper Leak 2022 )

दरम्यान, शनिवारी सकाळी बहुतांश विद्यार्थी केमिस्ट्रीचा पेपर देण्यासाठी परीक्षा केंद्रावर हजर झाले होते. काही वेळानंतर एक तरुणी पेपर देण्यासाठी आली नव्हती. हा प्रकार एका शिक्षकाच्या लक्षात येताच त्यांनी इतर शिक्षकांना ही माहिती दिली होती. याचदरम्यान ही मुलगी शौचालयातून घाईघाईने येत असल्याचे या शिक्षकाच्या निदर्शनास आले. उशिरा येण्याबाबत तिची चौकशी केली असता तिने उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. ती काहीतरी लपवत असल्याचे लक्षात येताच त्यांनी तिचा मोबाईल घेतला होता. त्यात एका व्हॉट्सअप ग्रुपवर शिक्षकांना केमिस्ट्रीचे एमसीक्यू प्रश्न दिसून (HSC Chemistry Paper Leak ) आले. पेपर लिक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी वरिष्ठांना ही माहिती दिली. पोलिसांना ही माहिती दिली. या माहितीनंतर पोलिसांनी संबंधिताविरुद्ध गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली होती.

यापूर्वी 2017 मध्ये बारावीचा बीकेचा एक पेपर लिक (HSC Chemistry Paper Leak ) झाला होता. याच गुन्ह्यांत नंतर कांदिवली पोलिसांनी एका शिक्षकाला अटक केली होती. त्यानंतर 2018 मध्ये पोलीस निरीक्षक दया नायक यांनी दहावीच्या पेपर लिकप्रकरणी दोन शिक्षकांना अटक केली होती. पोलिसांच्या चौकशीनंतर या मुलींना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. मुकेशला हा पेपर कोणी दिला. त्याने यापूर्वीही काही पेपर विद्यार्थ्यांना दिले होते का? याचा आता पोलीस तपास करीत आहेत. तसेच याबाबत आणखी कोणी याला साथीदार याला मिळाले आहेत का, याचा तपास पोलीस करताहेत.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.