जिवती:- जिवती तालुक्यातील अनेक रस्त्याचे नव्याने काम सुरु होणार असल्याने जागो जागी पुलियाचे काम सुरु आहे. व पुर्ण पने फुटलेल्या रस्त्याने साधी बैलगाडी चालवने कठिण झाले आहेत.
जिवती येथिल रहिवासी असलेल्या विवाहित जोडप्यानी दि. 25 मार्च रोज शुक्रवारला रात्री 7.30 च्या सुमारास शेणगाव वरुन जिवती कडे जात असताना अज्ञात चारचाकी चालकानी गाडी क्र.MH-34 BS 1037 या दुचाकीला मागुन धडक बसल्याने आशा विजय राठोड वय २५ या महिलेचा जागीच मृत्यु झाला व दुचाकी चालक विजय राठोड हे जखमी आहे. अज्ञात वाहनाची घटनास्थळावरून पसार झाली. पुढील तपास टेकामांडवा पोलीस करीत आहे.