दोन तमाशा कलाकारांची विष प्राशन करून आत्महत्या
Jalgaon - भिका-नामा तमाशा मंडळातील तरुण-तरुणीने विषारी पदार्थ घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना पारोळा शहरामध्ये घडली आहे. अंजली अशोक नामदास (२०, रा. दत्त कॉलनी, भुसावळ) आणि योगेश ऊर्फ सुनील नामदेव बोरसे (१९, रा. अंजाळे, ता. यावल) अशी दोघा मृतांची नावे आहेत. भिका-नामा तमाशा मंडळातील सदस्य बाभूळवाडी, जि. धुळे येथील तमाशाचे काम आटोपून ते गुरुवारी दुसऱ्या ठिकाणी जात होते. पारोळा शहरातीमधील कजगाव रोडवरील पेट्रोल पंपाजवळ त्यांचे वाहन नादुरुस्त झाले.
हे देखील वाचा:
|हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश : अभिनेत्रीकडून सुरू होता वेश्याव्यवसाय
त्यामुळे सर्वजण तिथेच थांबले होते, नंतर आम्ही बाजारात जाऊन येतो, असे त्यांनी आपल्या इतर सहकाऱ्यांना सांगितले. ते गेल्यानंतर लवकर परत न आल्यामुळे मंडळातील अन्य सहकाऱ्यांनी शोधाशोध सुरू केली, नंतर त्यांनी विष घेतल्याचे समजल्यामुळे त्या दोघांना गुरुवारी खासगी रुग्णालयामध्येनंतर तर शुक्रवारी पारोळा कुटीर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले.
दुपारी दोनच्या दरम्यान अंजली हिची प्राणज्योत मालवली, तर योगेशचा सायंकाळी सहाच्यादरम्यान मृत्यू झाला. याबाबत दोघांच्या नातेवाईकांनी पारोळा पोलिसांना माहिती दिली. त्यावरून आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.