'
30 seconds remaining
Skip Ad >

High profile sex racket exposed | हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश : अभिनेत्रीकडून सुरू होता वेश्याव्यवसाय - Batmi Express

0

Crime,Crime Live,crime news,Crime News Marathi,Sex Racket,Pune,Pune News,Pune Crime News,Pune Latest News,Pune Live,
High profile sex racket exposed | हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

पिंपरी : 
पिंपरी चिंचवड शहरात अवैध पद्धतीने सुरू असलेल्या हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. पोलिसांनी एका लॉजवर छापेमारी करत या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी दोन जणांना अटक केली आहे. तसेच वेश्या व्यावसायात गुंतलेल्या एका अभिनेत्रीसह दोन अन्य तरुणींची सुटका केली आहे. सामाजिक सुरक्षा पथकाने बुधवारी ताथवडे परिसरातील येथील लॉजवर ही छापेमारी केली आहे. या घटनेचा पुढील तपास वाकड पोलीस करत आहेत.

जितेंद्र हस्तीमल बोकाडिया उर्फ हितेश हस्तीमलजी ओसवाल असे अटक केलेल्या 48 वर्षीय आरोपीचे नाव आहे. तो सध्या वाघोली परिसरातील राहत असून तो मूळचा राजस्थानातील रहिवासी आहे.

हे देखील वाचा:

आईने  स्वतःच्याच मुलीला बलात्कार करायला लावलं! एकदाच नाही तर अनेकवेळा बलात्कार

तर हेमंत प्रणाबंधू साहू (32) असे अटक केलेल्या अन्य आरोपीचे नाव असून तो मूळ ओडिशा येथील रहिवासी आहे. त्यांच्यासह मुकेश केशवाणी, करण, युसूफ उर्फ लंगडा शेख यांच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जितेंद्र आणि हेमंत हे साथीदार मुकेश, करण, युसूफ यांच्या मदतीने हे हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट चालवत होते. व्हॉट्सॲपच्या माध्यमातून आरोपी वेश्या व्यावसायासाठी तरुणींना विविध लॉजवर पाठवत होते. याठिकाणी तरुणीच्या नावावर बुकींग केले जायचे. त्यानुसार ग्राहकांना पाठवून वेश्या व्यवसाय करवून घेतला जात होता. पण सामाजिक सुरक्षा पथकाला याबाबत गुप्त माहिती मिळाली होती.
त्यानुसार पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. यावेळी पोलिसांनी एका अभिनेत्रीसह अन्य दोन तरुणींची सुटका केली आहे. त्यानंतर पोलिसांनी संबंधित तरुणींच्या मदतीनेच दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. वेश्या व्यवसायाचे पैसे घेऊन जाण्यासाठी बोलावून पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. सुटका केलेल्या मुलींमध्ये एक छत्तीसगडची अभिनेत्री आहे. दुसरी राजस्थान तर तिसरी मुंबई येथील आहे. यावेळी पोलिसांनी आरोपींकडून 10 हजार रुपये रोख रक्कम, 9 हजार 500 रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन आणि इतर साहित्य जप्त केले आहे. या घटनेचा पुढील तपास वाकड पोलीस करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×