Karnataka Hijab | शाळेमध्ये शाळेच्या गणवेशाव्यतिरिक्त कोणताही पोशाख नसावा: शिवसेना नेते आदित्य ठाकरे | Batmi Express

Karnataka Hijab,Karnataka,Karnataka News,Karnataka Live,Karnataka Latest News,Maharashtra,Maharashtra Live,Maharashtra News,Mumbai,Mumbai Live,Mumbai

Karnataka Hijab,Karnataka,Karnataka  News,Karnataka Live,Karnataka Latest News,Maharashtra,Maharashtra Live,Maharashtra News,Mumbai,Mumbai Live,Mumbai News,
शाळेमध्ये शाळेच्या गणवेशाव्यतिरिक्त कोणताही पोशाख नसावा: शिवसेना नेते आदित्य ठाकरे

राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे  (Aditya Thackeray ) म्हणाले की, "जर शाळेमध्ये गणवेश बंधनकारक असेल तर त्या ठिकाणी इतर कोणत्याही पोशाखाला जागा नसावी. त्या ठिकाणी शाळा वा महाविद्यालये व्यवस्थापनेने सांगितलेला गणवेश बंधनकारक असावा. 

मुंबई : कर्नाटकातील हिजाब (Karnataka Hijab ) प्रकरणी देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असताना आता यावर राज्याचे मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शाळांमध्ये शाळेच्या गणवेशाच्या व्यतिरिक्त कोणताही गणवेश (School Uniforms ) नसावा असे त्यांनी म्हटले आहे. बुधवारी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. 

राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे  (Aditya Thackeray ) म्हणाले की, "जर शाळेमध्ये गणवेश बंधनकारक असेल तर त्या ठिकाणी इतर कोणत्याही पोशाखाला जागा नसावी. त्या ठिकाणी शाळा वा महाविद्यालये व्यवस्थापनेने सांगितलेला गणवेश बंधनकारक असावा. शाळा अथवा महाविद्यालयं ही शिक्षणाची केंद्र आहेत, त्याच ठिकाणी फक्त आणि फक्त शिक्षणालाच स्थान आहे." शैक्षणिक संस्थांमध्ये कोणत्याही राजकीय किंवा धार्मिक गोष्टींना कोणतेही स्थान नसावे असे आदित्य ठाकरे  (Aditya Thackeray ) यांनी म्हटले आहे.

दरम्यान, कर्नाटकातील हिजाबचा (Karnataka Hijab ) वाद आता न्यायालयात पोहोचला असून न्यायालयाच्या पुढील निकालपर्यंत विद्यार्थ्यांनी धार्मिक पोशाख घालू नयेत असे निर्देश कर्नाटक उच्च न्यायालयाने दिले आहेत. आता हिजाब प्रकरणावर पुढील सुनावणी सोमवारी होणार आहे. तसेच राज्यातील शाळा, महाविद्यालये पुन्हा सुरू करण्याचे आदेश देखील न्यायालयाने दिले आहे.

कर्नाटकातील शैक्षणिक संस्थांमधील हिजाबबंदी (Karnataka Hijab ) प्रकरणाने सध्या देशातले वातावरण तापलेय. महाराष्ट्रातही त्याचे पडसाद उमटलेत. कर्नाटक सरकारने शाळा आणि महाविद्यालये 12 फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्नाटकात महाविद्यालये आणि शाळांबाहेर हिजाब समर्थक आणि हिजाब विरोधक गटांकडून निदर्शने करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.