चंद्रपूर | पुनर्वसन केलं, सूविधा कोण पुरविणार! रामपुरवासियांचे वेकोली विरोधात आंदोलन - Batmi Expres

Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur Today,Maharashtra,

रामपुरवासियांचे वेकोली विरोधात आंदोलन 

चंद्रपूर (Chandrapur ) | 
वेकोलीने सास्ती कोळसा खाणीसाठी भडांगपूर गावाचे 1990 मध्ये रामपूर नावाने पुनर्वसन केले.मुलभुत सोयी सूविधा पुरविण्याचे आश्वासने दिलीत.मात्र आजतागायत आश्वासनांची पुर्तता झालेली नाही.त्यामुळे संतापलेल्या रामपूर वासीयांनी आज वेकोलीच्या मुख्य महाप्रबंधक कार्यालयापुढे धरणे आंदोलन दिले. 

शुद्ध पिण्याचे पाणी नाही, रस्ते, सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्या, प्रकल्पग्रस्तांना जमीनीचे पट्टे, मुलांना शिक्षणासाठी शाळा, जेष्ठांना बसण्यासाठी बगिचा अश्या अनेक मागण्या करण्यात आल्या. 

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.