चंद्रपूर : महाराष्ट्रातील सिमेवरील शेतातील विहीरीत महीलेचा शव आढळला. पोलीसांनी तपासाची चक्रे फिरविली. तपासात धक्कादायक माहीती समोर आली. चार महीण्याचा गर्भवती मुलीचा हत्येसाठी आईनेच सूपारी दिली होती. सैदा बदावत असे मृतक महीलेचे नाव आहे. सैदाची आई लचमी बदावत, सिन्नू, शारदा या तिघांना विरूर पोलीसांनी अटक केली आहे. मृतकची आणि तिन्ही आरोपी तेलंगणातील आहे.
हे देखील वाचा:
महाराष्ट्र -तेलंगणा राज्याचा सिमावर्तीत भागात असलेल्या राजूरा तालुक्यातील कविठपेठ येथिल शेतातील विहीरीत महीलेचा मृतदेह आढळला. मृतक महीलेची ओळख पटविण्यासाठी विरूर पोलीसांनी सोशल मिडीया, प्रत्येक पोलीस स्टेशनला मृतक महीलेचा फोटो पाठविला होता. अश्यात तेलंगणातील कोंडापेल्ली विजयवाडा येथून पोलीसांना भ्रमणध्वनी आला अन तपासाला गती मिळाली. मृतक महीलेचे नाव सैदा बदावत असून ती कोंडापेल्ली विजवाडा येथे राहत असल्याची माहीती मिळाली. पोलीसांनी अधिक तपास केला असता धक्कादायक माहीती समोर आली. सैदा हीचा दहा वर्षापुर्वी विवाह झाला होता. तीला नऊ वर्षाची मुलगी आहे. ति पतीला सोडून एकटीच राहत होती.
आपली मुलगी चुकीचे काम करतयं हे कळल्यावर वडील आणि मुलीत भांडणे व्हायची. आपल्या मुलीने झोपेच्या गोळ्या देऊन आपल्या नवर्याला ठार मारलं अशी शंका आई लचमीला होती. त्यात सैदा चार वर्षाची गर्भवती असल्याची माहीती होताच आईचा पारा भडकला. या प्रकाराने आपली बदनामी होईल, असे तिला वाटले.खमंग येथिल लग्नसोहळ्यात सिन्नू, शारदा या पती-पत्नीची ओळख लचमीला झाली. जे काही घडलं ते लचमीने सिन्नू आणि शारदाला सांगितले. मुलगी सैदाला मारून टाका, त्यासाठी 30 हजार रूपये देण्याची कबुली लचमीने केली. ठरल्यानुसार गर्भपात करण्याचा बहाण्याने सिन्नू आणि शारदा या दोघांनी सैदा हीला चंद्रपूर जिल्ह्यातील कविठपेठ येथे आणले. आत्राम नामक शेतकऱ्याचा शेतातील विहीरीत सैदाला धक्का दिला. यात सैदाचा मृत्यू झाला. विरूर पोलीसांनी आई लचमी, सिन्नू, शारदा यांना अटक केली आहे.